पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे पिंपरी-चिंचवड शहरातील 12 कोरोना बधित रुग्णांपैकी पहिले तीन रुग्ण कोरोना मुक्त झाले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 5 कोरोना बाधित रुग्ण कोरोना पासून मुक्त झाले या सर्वांना घरी सोडण्यात आले असताना आता पिंपरी-चिंचवड शहरात फक्त दोनच कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.
पिंपरी चिंचवडमधील आणखी एका करोना पॉझिटिव्ह रुग्ण करोनामुक्त झाला आहे. या रुग्णाचे आज दुसरेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. लवकरच त्यास डिस्चार्ज दिला जाणार आहे. शहरातील 12 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 10 रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. आत्ता केवळ दोनच करोना बाधित रूग्ण उपचार घेत आहेत, लवकरच ते सद्धा बरे होतील.