निजामुद्दीन मधून आलेले दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह…

पिंपरी (दि. २ एप्रिल २०२०) :- दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील ३२ जण होते. त्यानंतर शोधाशोध करून २२ जणांना क्वारंटाइन करण्यात पोलीस आणि आरोग्य विभागाला यश आले. यांच्यातील काही जणांचा रिपोर्ट आला असून यात दोन जण पॉझिटिव्ह तर ६ जण निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. निगेटिव्ह रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असून होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दिल्लीमधील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात शहरातील ३२ जण सहभागी झाले होते. तेथील कार्यक्रमात काही जणांना करोना झाल्याची माहिती असून महाराष्ट्रातील अनेक जण त्या ठिकाणी गेलेले होते. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३२ जण गेले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी २२ जणांना शोधण्यात यश आले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


त्यांच्या घशाचे द्रव्य हे पुण्यातील एनआयव्हीला आज सकाळी पाठवण्यात आले असून त्यातील दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह तर सहा जनांचे टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार असून त्यांना होम क्वारंटाइनमधे ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित व्यक्तींचा रिपोर्ट उद्या येणार आहे.


Popular posts
दिव्य मराठी विशेष / आता पीएचडीच्या संशाेधनाचे होणार मूल्यमापन, समाजोपयोगी असेल तरच देण्यात येईल अभ्यासकाला पदवी
चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना घरपोच मिळणार भाजीपाला; सोशल डिस्टंसिंगच्या पालनासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचा सामाजिक उपक्रम
एकजुटीने कोरोनाचा अंधार मिटवूया; पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश
देशात कोरानाचा चौथा बळी : जर्मनीवरून परतलेल्या वृद्धाचा पंजाबमध्ये मृत्यू; अधिकाऱ्यांच्या देखरेखीत केले अंत्यसंस्कार
पिंपरी-चिंचवड करांना आनंदाची बातमी; पिंपरी-चिंचवड होत आहे कोरोना मुक्त