नवांशहर - पंजाबमध्ये गुरुवारी कोरोना व्हायरसमुळे 70 वर्षीय बलदेव सिंह यांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने याची पुष्टी केली आहे. यानंतर देशातील कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चारवर पोहोचली आहे. बलदेव सिंह 12 दिवसांपूर्वी जर्मनी आणि इटलीवरून परतले होते. ते नवांशहरच्या पठलावा या गावचे रहिवासी होते.
वृद्धाला देखरेखेखाली ठेवले होते
शासकीय रुग्णालय बंगाचे एसएमओ कविता शर्मा यांनी सांगितले की, बलदेव सिंह यांना अगोदर हृदय रोगाचा त्रास होता. परदेशातून परतलेल्या लोकांवर देखरेख ठेवली जात होती, बलदेव यांचे नाव या यादीत समाविष्ट होते. 11 मार्च रोजी आरोग्य विभागाने तपास केला, मात्र तेव्हा त्यांच्या कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती. 18 मार्च रोजी सकाळी 6 वाजता हृदयात त्रास जाणवल्यानंतर कुटुंबियांना त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र अर्ध्यातासानंतर त्यांचा मृत्यू झाला.
पॉझिटिव्ह आला रिपोर्ट
आरोग्य विभागातर्फे बलदेव यांची माहिती अधिकाऱ्यांकडे दिली आहे. यानंतर डॉक्टरांच्या टीमने मृतदेहातून नमुने घेतले आणि तपासणी पाठवले होते. त्यांच्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसची पुष्टी झाली आहे.